तुम्ही मोठ्या कष्टाने कमवलेल्या बँक ठेवींवर सरकार मारणार डल्ला ?

टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही कष्ट करता आणि मोठ्या मेहनतीने पैसे कमवून विश्वासाने बँकेत मुदतठेव म्हणून ठेवून देता. पण आता जर तुम्ही मुदतपूर्तीनंतर ती परत घ्यायला गेलात आणि बँकेने तिची मुदत तुमच्या परवानगीशिवाय वाढवली तर तुम्ही काहीच करू शकत नाही. किंवा ठेवीची रक्कम सुद्धा पूर्ण दिली नाही तरी सुद्धा तुमच्या हातात काहीही नसणार कारण केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआयडीआय) हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

या विधेयकातील तरतुदीनुसार आज बुडत असणारी बँक वाचवण्यासाठी कलम ४८ व ५३ मध्ये ठेवीदारांसाठी हेअर कटची तरतूद आहे. यानुसार बँक कोणत्याही कारणांनी आजारी झाल्यास किंवा अवसायनात गेल्यास तिला वाचवण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांनीच आपल्या स्वकष्टार्जित ठेवींतील काही रकमेचा त्याग करावा आणि ही रक्कम भागभांडवलात परिवर्तित करावी. अर्थात याचा निर्णय एफआरडीआय महामंडळ घेणार आहे. यात ठेवीदाराला मत किंवा इच्छा विचारली जाणार नाही.’

दरम्यान, या विधेयकाला ग्राहक पंचायतीने कडाडून विरोध केला आहे. तेव्हा येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होत का ? हे पाहण्यासारख आहे.