सामाजिक कार्यात आर्थिक नियोजन व पारदर्शकता याला खूप महत्व

Abhay Mahajan , I.A.S.

अहमदनगर: सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तृणमूल कार्यासोबतच उत्तम व्यवस्थापन कौशल्य असणे महत्वाचे आहे. तसेच शासन व लाभार्थी यांच्या मधील समन्वय साधण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते. या बरोबरच प्रत्येक सामाजिक कार्यात आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता महत्वाची असल्याचे प्रतिपादन अहमदनगर चे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले. स्नेहालय संस्था आणि प्रयास ,अमरावती आयोजित सेवांकुर २०१७ या युवा प्रेरणा शिबिराच्या समारोपाच्या सत्रात जिल्हाधिकारी महाजन बोलत होते.स्नेहालयाचे सुवालाल शिंगवी,डॉ.गिरीश कुलकर्णी,जयवंत गडाख,संजय गुगळे,राजीव गुजर,स्नेहस्पर्ष संस्थेचे संस्थापक नरेश पाटील आणि प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ.अविनाश सावजी आदी उपस्थित होते.अभय महाजन म्हणाले कि शासनाच्या अनेक उत्तम सामाजिक सुधारणांसाठीच्या योजना लाभार्थ्यां साठी विचार पूर्वक केलेल्या असतात.त्यातीलच मनरेगा या शासकीय योजने संबंधी सविस्तर माहिती त्यांनी या वेळी दिली.तरुण सामाजिक कार्यकर्ते अश्या शासकीय योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठीचा दुंवा म्हणून कार्य करू शकतात.व्यवस्थापन कौशल्यबद्दल मार्गदर्शन करताना अभय महाजन म्हणले की आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेऊन काम केल्यास त्याचे यश निश्चित मिळते.त्यासाठी वेळप्रसंगी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ देणे गरजेचे ठरते. शिबिरार्थींच्या अनेक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुमारे ४५० पेक्षा जास्त शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले. या वेळी रोशनी पहानपटे, अमृता कोल्हाट, इरफान पठाण, अमोल श्रीधर आणि राहुल दासवे यांनी शिबिरार्थींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत आणि शिबिराबद्दलचा अभिप्राय व्यक्त केला.