वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; राज्यमंत्री सत्तारांचा पुढाकार!

वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; राज्यमंत्री सत्तारांचा पुढाकार!

abdul sattar

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील मधुकर लोटू नंनवरे यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. याबाबत महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासनास पाठपुरावा करून पीडितांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून दिली. मंगळवारी ( दि. १९ ) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात पीडितांच्या नातेवाईकांना शासकीय मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला.

गेल्या १५ दिवसांपूर्वी हळदा येथील मधुकर लोटू नंनवरे ( वय ४० ) यांच्यावर अचानकपणे वीज पडल्याने या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान झालेल्या घटनेनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हळदा येथे जावून पीडितांच्या घरी सांत्वन भेट दिली होती. पीडितांना तातडीने शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली होती.

त्याअनुषंगाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना तातडीने शासनाची मदत देण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी पीडित कुटुंबियांना ४ लाख रुपयांचा धनादेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यच्याहस्ते वितरित करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या