केरळातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – संपूर्ण केरळ राज्यात अति पर्जन्य वृष्टीने हाहाकार उडाला आहे. पुरामुळे केरळात 37 जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद माहिती पुढे आली आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केंद्र आणि राज्यसरकार करीत आहे. या नैसर्गिक अपत्तीवेळी केरळ वासीयांसोबत सर्व देश उभा आहे. सर्व प्रकारची सरकारी बचाव पाथके मदत करीत आहेत. येथील पूरग्रस्तांना सरकार ने आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

केरळ राज्यावर कोसळत असलेल्या अस्मानी संकट काळात देशवासीय केरळवासीयांसोबत आहेत. प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळे केरळ मध्ये जागोजागी पूर आलेला आहे.दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.सामान्य जणांचे घराचे व्यवसायाचे नुकसान झाले आहे.पूरग्रस्तांना सरकारने नुकसान भरपाई तसेच आर्थिक मदत दिली पाहिजे.या महापूरात अनेकांचा जीव गेला असल्याने बचावकार्यासाठी सारकारने अधिक प्रमाणात बचाव पथके येथे तैनात करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी चेतन तुपे