महाविद्यालय प्रशासनाच्या हलगर्जीपनाचा विद्यार्थांना आर्थिक फटका

abvp student pune

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे विद्यार्थांना ईबीसीच्या समस्यांना सामोरे जाव लागत आहे. १५०० पेक्षा जास्त विद्यार्थांना याचा फटका बसला आहे.

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये जेएसपीएम, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे मागील महिन्यात विद्यार्थ्यांकडून ईबीसी अर्ज भरून घेतले. त्यांमध्ये अनेक विद्यार्थांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राभावी रद्द करण्यात आले. तर काही अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र त्यानंतर विद्यार्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईबीसी अर्ज रद्द करण्यात आले. याचा आर्थिक फटका सामान्य विद्यार्थांना बसला आहे.

या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्र. सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांना विद्यार्थांच्या ईबीसी अर्जासंदर्भात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा योगेश्वर पुरोहित, अभाविप मंत्री (गणेश खिंड भाग) यांनी दिला आहे.