अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे पतीच म्हणतात ; भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा : देशाची अर्थव्यवस्था धोक्यात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकडे नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी एका वृत्तपत्रातील लेखात म्हटलं आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलायला हवीत. असे म्हंटले आहे. हैदराबादमधील राईट फोलियो नावाच्या खासगी कंपनीत प्रभाकर व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

या लेखात, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. परंतु समोर येणाऱ्या आकडेवारीतून अर्थव्यवस्थेसमोरील संकट दिसून येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे,’ असं प्रभाकर यांनी लिहिलं आहे. त्याच बरोबर घटलेला जीडीपी आणि त्यामुळे गेलेल्या नोकऱ्यांची आकडेवारीदेखील त्यांनी लेखात दिली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर पोहचला असून हा दर मागील सहा वर्षांमधील हा निच्चांक आहे. तर बेरोजगारीचा दराने गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला असल्याच प्रभाकर यांनी या लेखातून मांडले आहे.

त्याचप्रमाणे आर्थिक संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारकडे काही ठोस रणनीती असल्याच मला वाटत नाही. याची कल्पना भाजपाला असल्यानेच लोकसभा निवडणुकीत अर्थव्यवस्थेचा मुद्द्यावर न बोलता त्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा हेच विषय केंद्रस्थानी ठेवले होते. अशा शब्दांमध्ये प्रभाकर यांनी भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील रणनीतीचं विश्लेषण केलं.

दरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत, हे धोरण भाजपा नेतृत्त्वानं निश्चित केलं असल्याने अर्थव्यवस्था संकटात असण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही, आदि बाबींच सखोल विश्लेषण प्रभाकर यांनी या लेखात केल आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...

 

Loading...

Loading...