अखेर वायुसेनेचा वाघ विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल

blank

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तानच्या  ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अटारी बोर्डरवर पोहचले आहेत. अभिनंदनच्या स्वागतासाठी अटारी बोर्डरवर सामान्य नागरिकांनी तुडुंब गर्दी केली आहे.

भारतीय वायुदल आणि पाकिस्तान लष्करामध्ये  वर्धमान यांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया केली जात  आहे. अभिनंदन हे अटारी येथून दिल्लीला जाणार आहेत. त्यांना घेण्यासाठी भारतीय वायुसेनेचे अधिकारी पोहचले आहेत. अटारी बोर्डरवर अभिनंदनचे आई वडील देखील उपस्थित आहेत. तर अटारी बोर्डर वर होणारी बिटिंग रिट्रीट सेरेमनी  रद्द करण्यात आली आहे.

भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकला प्रत्युत्तर देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सतर्क असणाऱ्या भारतीय वायुदलाने पाकच्या विमानांना पिटाळून लावले होते. यावेळी मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली होती. यावेळी स्थानिक पाकच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेत होत.

काल पाकिस्तान संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी पुढाकार म्हणून भारतीय वैमानिकाची सुटका करणार असल्याची घोषणा केली होती. तसेचं आमच्या या पावलाला कोणी पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. असा इशारा देखील इम्रान खानने दिला होता.दरम्यान, नंदन वर्धमान हे सध्या इस्लामाबादमध्ये असून त्यांना दुपारी लाहोरला आणले जाणार आहे. त्यानंतर वाघा बॉर्डरद्वारे भारतात आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.