fbpx

अखेर सप्तश्रुंगी गडावरील फ्युनिक्यूलर ट्राॅलीचं लोकार्पण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या वणी येथील सप्तश्रुंगी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्राॅलीचं लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यासोबतच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ही उपस्थित होते.

या ट्राॅलीमुळे वृद्धांना, लहान मुले, दिव्यांग भाविकांना याचा फायदा होणार आहे. मंदिराला ५५० पायऱ्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी बऱ्याच महिन्यांपासून ट्राॅली लोकार्पणाच काम रखडलं होतं.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ट्राॅलीचं काम हाती घेण्यात आलं होतं. एका वेळी ६० भाविक या ट्राॅलीतून प्रवास करू शकतात. अवघ्या दीड मिनिटांत भाविक मंदिरात पोहोचू शकतील. भारतातील पहिलाचं अशा स्वरूपाचा रोप वे बनवण्यात आला आहे. २.७ मीटर प्रती सेकंद या वेगाने ट्राॅली खालूनवरती आणि वरून खाली येते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यातआले आहेत.

शेतकऱ्यांसाठी बातमी : दुष्काळाबाबतची नवीन नियमावली जाहीर…