अखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द!

नानार प्रकल्प

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेने अखेर नानार प्रकल्प रद्द करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. नानारवासियांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.

सुभाष देसाईंच्या उद्योग मंत्रालयाने १८ मे २०१७ रोजी काढलेला अध्यादेश १५ दिवसात रद्द करण्याचे  आश्वासन उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०१७ ला दिलं होतं, मात्र ते पूर्ण न केल्याबद्दल नाणारवासियांनी नाराजी व्यक्त केली होती.

१७ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी सभेकडे पाठ फिरवण्याचं ठरवलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. मात्र नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली रद्द कठोर निर्णय घेतला आहे.