पुणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला. या निवडीमुळे राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे.
महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांची झालेली निवड लक्ष्यवेधी ठरणार आहे.
दरम्यान, चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वंचित, दुर्लक्षित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे ‘मुप्टा’
- हिवाळी अधिवेशनात आमदारांसह प्रत्येकाला डोस नंतरही ‘आरटीपीसीआर’ टेस्ट सक्तीची
- ‘माझे पूर्ण ह्रदय एकाच फ्रेममध्ये..’म्हणत अनुष्काने केला विराटचा’तो’फोटो शेअर
- ‘मोदींच्या स्मार्ट सिटी, अमृत योजनांच्या अमिषाने शहरांची अधोगती झाली’, खा.वंदना चव्हाण यांचा आरोप
- गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<