अखेर MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरली ; ‘या’ तारखेला परीक्षा

mpsc

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील चार लाख परीक्षार्थी दोन वर्षांपासून या परीक्षेची चातकासारखी वाट बघत असतानाच आता अखेर सरकारनं परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती, मात्र कोविड विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. लोकसेवा आयोगाने या परीक्षेसंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. यात असे म्हले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२० पुढे ढकलण्यात आली होती.

सामान्य प्रशासन विभागाच्या ९ एप्रिल २०२१ च्या पत्रान्वये सूचना प्राप्त झाल्यानंतर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट २०२१ रोजी आलेल्या पत्रातील अभिप्रायानुसार ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल. एमपीएससीच्या परीक्षार्थींनी 9 ऑगस्टपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता आयोगाला जाग आली आहे.

‘कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनच्या अनुषगांने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतच माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल’, असं परिपत्रकातून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या