सरपंचाच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांची ‘त्या’ कार्यक्रमाला दांडी

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गौरव सोहळ्यास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दांडी मारली आहे. पाथर्डी तालुक्यातील यळी गावच्या सरपंचाने मुख्यमंत्री या कार्यक्रमास आल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याने, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार का ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

bagdure

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी पिता बबनराव ढाकणे यांच्या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली होती. पूर्वाश्रमीचे भाजपचे असणारे ढाकणे कुटुंब जिल्यातील जुन्या भाजपच्या फळीला आपल्या मंचावर आणून आपल्या ताकदीचे प्रदर्शन करण्याच्या तयारीत होते, मात्र भाजप मधील एका गटाने ढाकणेंचा हा मनसुबा हाणून पाडला आहे.

भाजपमध्ये पाथर्डीत तीन गट आहेत. त्यातील एका गटातील नेत्यांची नावे ढाकणे यांनी पत्रिकेत छापलीच नाही. त्यात खासदार दिलीप गांधी व माजी आमदार दगडू बडे यांचा समावेश आहे. त्यामुळे हा गट नाराज असणे स्वाभाविकच होते. त्यात भाजपचा कार्यकर्ता संजय बडे यांनी तर मुख्यमंत्री आल्यास आत्महत्येचाच इशारा दिला होता.

You might also like
Comments
Loading...