fbpx

बळीराजाला दिलासा : अहमदनगरमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात काही ठिकाणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात का होईना हजेरी लावली. मात्र राज्याच्या काही भागात बळीराजा वरुणराजाची आतुरतेने वाट बघत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता हा कृत्रिम पाऊस दरवर्षी पाडला जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती हटवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केल्यानं तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.

पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसंच बीड जिल्ह्यातील शिरूर पर्यंत दमदार पावसाची सुरुवात झाली.

दरम्यान, यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे. 9 ऑगस्टपासून सुरू केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला आता काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. अमेरिकेहून आलेल्या विमानाने मराठवाड्याच्या आकाशात घिरट्या घालायला सुरुवात केली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या