fbpx

अखेर नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्यास सुरवात

nagraj-manjule-and-univercity-ground

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या नवीन हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी सेट उभारला होता. विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला. माध्यमांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. ‘महाराष्ट्र देशाने’ या प्रकरणाचा सतत पाठपुरवठा केला. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्यासाठी विद्यापिठ्याने नागराज मंजुळेना ३ वेळा पत्रव्यवहार केला. मात्र मंजुळेनी विद्यापीठाला गांभीर्याने घेतले नव्हते. दरम्यान, नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा सेट काढण्याचं काम सुरु करण्यात आलं असल्याची घोषणा मंजुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

nagraj manjule

विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते.

मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते.

nagraj and Prof Nitin R Karmalkar

राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तरी देखील विद्यापीठ आणि मंजुळे चालढकल करत होते. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांना सेट काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नागराज मंजुळे यांना पत्राव्दारे सेट काढण्याचे तसेच नाही काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

nagraj movie set

(महाराष्ट्र देशाने या प्रकरणाचा केलेला पाठपुरवठा) 

नागराज मंजुळेंवर विद्यापीठ मेहेरबान का ?

नागराज मंजुळे प्रकरणी राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका उघड ?

नागराज मंजुळेंना दणका! ७ दिवसात विद्यापीठाचे मैदान खाली करण्याचे आदेश

कुलगुरूंचे नागराज मंजुळेंना अभय आहे का?

नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

अखेर नागराज मंजुळेंनी विद्यापीठ मैदानावरील सेट काढण्यास केली सुरवात !