अखेर सज्जनकुमार यांनी दिला कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा :  १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगली संदर्भात जन्मठेपेची शिक्षा झालेला काँग्रेस नेता सज्जन कुमार याने आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून त्याने आपला हा निर्णय कळवला आहे. या दंगलीतील दोन दोषींना प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती. येत्या ३१ डिसेंबरपूर्वीच सज्जन कुमार यांना शरणागती पत्करावी लागणार असल्याने त्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे.

bagdure

शीखविरोधी दंगली प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ३० एप्रिल २०१३ रोजी सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांच्यासह आणखी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

You might also like
Comments
Loading...