संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

वेब टीम- संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून यात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या सिनेमात संजय दत्तची विविध रूपे दाखवण्यात आलेली आहेत.

संजय दत्तला अवैध शस्राश्र प्रकरणात 6 वर्षांची शिक्षा झाली होती. येरवडा कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. येरवडा कारागृहाच्या दृश्यांनीच ट्रेलरची सुरुवात करण्यात आली आहे.

सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारही या ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.

रणबीर कपूरसोबतच या सिनेमात सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्या, परेश रावल यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. त्यामुळे तिने दिलेली ही प्रतिक्रियाही महत्व प्राप्त झाले आहे.  सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजू सिनेमा 29 जूनला  रिलीज होणार आहे.