fbpx

शेवटी मुलायमसिंह यांनी मुलाला त्याची जागा दाखवली – राजासिंह

टीम महाराष्ट्र देशा – राजकारणात कोण कोणचा कधी शत्रू नसतो याची प्रचिती सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पहावयास मिळाली. समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायमसिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली,याच पार्श्वभूमीवर तेलंगणातील भाजपाचे आमदार राजासिंग यांनी एका सभेत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. आणि मुलायमसिंह यांनी मुलाला त्याची जागा दखवून दिली असे म्हणाले . ‘बाप बाप होता है…’ असे म्हणत आमदार राजासिंग यांनी अखिलेश यांना टोला लगाव.

यावेळी राजासिंग म्हणाले की, अखिलेश यांना मायावती आणि ममता बॅनर्जी यांचा पुळका आलाय. पण मी तुझा बाप आहे असे मुलायमसिंह यांनी मुलाला दाखवून दिलं आहे.

अखिलेश हे मायावतींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतात तर कधी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान पदी पाहतात आणि वडिलांना पडद्याआड करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शेवटी मुलायमसिंह यांनी मुलाला त्याची जागा दाखवली असे म्हणत राजासिंह यांनी अखिलेश यादव यांना टार्गेट केले.