fbpx

अखेर या चित्रपटात झाला ‘दीप-वीर’ च्या कथेचा हॅप्पी एण्डिंग

टीम महाराष्ट्र देशा : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘रासलीला-रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये दीपिका आणि रणवीर यांच्या अभिनयाने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सर्वाधिक लोकप्रिय जोडयांमध्ये दीप-वीर यांचा समावेश आहे. ही जोडी अग्रस्थानी आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लवकरच रणवीर आणि दीपिका ही जोडी कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटातून स्क्रीनवर दिसणार आहेत. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वषकाच्या यशस्वी कथेवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत आणि दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटीया यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच दीपिका या चित्रपटाची निर्माती असल्याचे देखील चर्चेत आले आहे. तर्कानुसार दीपिका यात पाहुणी कलाकार म्हणून दिसेल. या चित्रपटात एक सीन असा आहे ज्यात भारताचे विकेट पडू लागताच ती स्टेडीयम मधून बाहेर निघून जाते. आणि जेव्हा ती परत स्टेडीयममध्ये येते तेव्हा भारत हा सामना जिंकू लागतो.

आतापर्यंत एकत्र काम केलेल्या तिन्ही चित्रपटात हॅप्पी एण्डिंग पाहायला मिळाला नाही अशी चाहत्यांची तक्रार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाहत्यांची तक्रार दूर होणार आहे. ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर लग्नानंतर प्रथमच पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना लवस्टोरीदेखील पाहायला मिळणार आहे. सध्या दीपिका छपाक चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आणि ती कान्स फेस्टिव्हलसाठी न्यूयार्कमध्ये आहे.