अखेर ऑस्ट्रेलियात फेसबुककडून बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास बंदी

फेसबुक.

ऑस्ट्रेलिया: सोशल मिडिया प्लाटफॉर्म आणि सर्च इंजिन मुळे लोकांना जगभरातील माहिती एका क्लिकवर मोफत मिळवण्याची मोठी संधी गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झाल्याने जग इतकं जवळ आले की, जग एक खेड बनलं आहे. मात्र आता या प्लॅटफॉर्म साठी पैसे मोजावे लागणार आहेत.

याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पारित झालेलं एक विधेयक यामध्ये हे प्लॅटफॉर्म विनामूल्य इतरांची माहिती लोकांना दाखवाटता यामध्ये विशेषतः मोफत दाखावल्या जाणऱ्या बातम्यांच्या द्वारे हे प्लॅटफॉर्म करत असलेल्या कमाई वर या विधेयकात आक्षेप घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर फेसबुकने आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला बंदी घेतली आहे. सध्या फेसबुकचे ऑस्ट्रेलियातील मीडिया लॉ वरून सरकारशी संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने आपले पेज देखील बंद केले आहे.

या प्रकरणावर फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांनी मीडिया लॉ च्या विरुद्ध पाऊल उचलले आहे. बंदीनंतर ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस, हवामानाशी संबधित माहिती देणारे पेज, सरकारी कार्यालये, वेगवेगळ्याच्या विभागा, इतर आप्त्कालीन पेज बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नव्या मीडीया लॉ विरोधात ही बंदी घातली जात असल्याचे फेसबुकने म्हटले. फेसबुकच्या या बंदीचा फटका अनेक वृत्तसंकेत स्थळांना बसला आहे.ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असलेल्यांना फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातमी वाचता येत नाहीये. हवामान किंवा इतर सेवांशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ट्विटरचा आणि विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या