गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुक अगदी जवळ आलेले असताना आणि काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरु असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार समाजाचे नेते असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काही महिने आधीच हार्दिक पटेल आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. हार्दिक पटेल यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून टाकले होते. यानंतर हार्दिक पटेल पक्ष सोडणार याची सर्वत्र चर्चा होती. त्यानुसार अखेर आता निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. यासंदर्भात पटेल यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे.
हार्दिक पटेल यांनी मागील काही दिवसांपूर्वीच भाजपची आणि मोदींची स्तुती केली होती. भाजपच्या कामांची स्तुती करतानाच त्यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका सुद्धा केली होती. पटेल कॉंग्रेसच्या नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत होते. कॉंग्रेसमध्ये आपल्याला काम करू दिले जात नाही, असा जाहीर आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. दरम्यान या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजी कॉंग्रेसला खूपच महागात पडू शकते.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
हार्दिक पटेल काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या, एका मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी राम मंदिर आणि कलम ३७० या मुद्द्यावर भाजपचे कौतुक केले होते. आता त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. पटेल यांचा राजीनामा, आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यावर सुरु असलेली कारवाई आणि एकीकडे भाजपचे भलं मोठं आव्हान असतानाच, आता आम आदमी पक्षाने गुजरात मध्ये ठोकलेला शड्डू यामुळे काँग्रेससाठी गुजरात निवडणूक अधिक कठीण झाली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :