अखेर वढू गावात भाईचारा, उर्वरित भागात कधी ?

wadhu gav

पुणे : भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर  अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींमध्ये पुण्यातील वढूमध्ये आज बैठक घेण्यात आली. यामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्यावर दोन्ही गटांचं एकमत झाले असून गोविंद महाराजांची समाधी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज बैठक झाल्यानंतर वढू गावातील दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन यापुढे गावातील निर्णयांमध्ये गावाबाहेरील लोक हस्तक्षेप करणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला.

वढू गावात २९ तारखेला झालेल्या वादानंतर गोविंद महाराजांच्या समाधीच्या छत्रीची मोडतोड करण्यात होती. त्यानंतर गावकऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही गटातील लोकांनी एकोप्याने राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीत झालेले निर्णय

*अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेणार
*यापुढे गावातील सर्व निर्णय गावातील लोकच घेतील
*गावातील निर्णयावर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नसणार