अखेर अरविंद केजरीवालांनी आंदोलन मागे घेतल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर त्याचं आंदोलन मागे घेतल. केजरीवाल नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन करत होते. तुम्ही कुणाच्याही घरी किंवा कार्यालयात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? असा सवाल हायकोर्टाने आम आदमी पक्षाला विचारला होता.

अरविंद केजारीवालांच्या आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यासह इतर मागण्या होत्या. हे धरणं आंदोलन नव्हतं, तर आम्ही नायब राज्यपालांच्या भेटीसाठी वाट पाहत होतो, असे मनिष सिसोदिया म्हणाले.

मनिष सिसोदिया म्हणाले, “आज अनेक मंत्र्यांनी बोलावल्यानंतर आयएएस अधिकारी आले. आमचं काही कुठल्या आयएएस अधिकाऱ्याशी भांडण नाही. तसेच काही अधिकाऱ्यांनी आज असेही संकेत दिले की, त्यांना वरुनच आदेश होते. अधिकारी आज बैठकीला आले, तसे उद्याही यावे.”,

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे पी. विजयन आणि कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठींबा जाहीर केला होता.

अरविंद केजरीवालांच्या बंगल्यामध्ये मुख्य सचिवांना मारहाण ?