अन् अखेर १४ वर्षांनी लागला संदीप मोहोळ खून प्रकरणाचा निकाल ; तिघांना जन्मठेप

sandeep mohol

पुणे : कुख्यात गुंड संदीप मोहोळ यांच्या खून प्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघा आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला.

संदीप मोहोळ हा ४ ऑक्टोंबर २००६ रोजी कारमधून जात असताना पौड फाटा येथे सिग्नलला कार थांबली. तेव्हा पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी हातोड्याने कारच्या काचा फोडल्या व त्याच्यावर जवळून गोळ्या घालून निर्घुण खून केला. टोळी युद्धातून हा खुन झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली होती.तत्कालीन दोन जिल्हा सरकारी वकिलांनी काम पहिले होते. तर आरोपींकडून बारा वकिलांनी बाजू मांडली होती.

मारणे टोळीतील अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी २००६ साली संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले होते. तब्बल १४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी हा आजचा लागला निकाल आहे.

टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप मोहोळ याचा 4 ऑक्‍टोबर 2006 रोजी पौड फाटा येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. यानंतर गुन्हे शाखेने गणेश मारणे, सचिन पोटे आणि इतर अशा 18 जणांना अटक केली होती. याप्रकरणी मोक्का, आर्म ऍक्‍ट, खून यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल होता. यात पांडुरंग मोहोळ, दिनेश आवजी आणि इंद्रनील मिश्री यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP