fbpx

जमलं हो जमलं..! महेश लांडगेंचं मन वळवण्यात आढळरावांना यश; आता विजय पक्का

पुणे –  निवडणुकीच्या तोंडावर भाजप –  शिवसेना नेत्यांमधील नाराजी दूर होतं दिसत आहे. शिरुरचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज भाजपशी संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन गैरसमज दूर केले.

भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची समजूत काढण्यात अखेर आढळरावांना यश आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी दुर झाल्याने आढळराव पाटलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता आढळरावांच्या प्रचार करण्यात आता आमदार लांडगे सक्रिय सहभाग घेणार आहेत.

गेल्या पाच वर्षात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यात प्रचंड संघर्ष  पाहायला मिळाला. पण आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावं लागलं.