अखेर संस्कृत विभागात ८३ विद्यार्थांना मिळाला प्रवेश

विद्यापीठ प्रशासन नरमले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागात पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाकडून प्रवेश नियमात बदल करण्यात आले होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. महाराष्ट्र देशाने सदर प्रकरणाचा पाठपुरवठा केला होता. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने विद्यापीठात आंदोलनल देखील केले होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन अखेर नरमले असून आता संस्कृत विभागात एकूण ८३ विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला आहे.

संस्कृत विभागात एकूण १३ विविध अभ्यासक्रम चालविले जातात. सर्व विभागातिल ३९० जागेसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी एकूण ११८ अर्ज विद्यापीठास प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर विद्यापीठाने अकरावीत व बारावीत संस्कृत विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार अशी अट टाकली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता. नवीन अटींमुळे फक्त ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. तसेच एकूण ९०% जागा रिक्त होत्या. सदर प्रकरणाची माध्यमांनी दखल घेतली आणि विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यानंतर विद्यापीठाने एकूण ८३ विद्यार्थांना संस्कृत विभागात प्रवेश दिले आहे.