टीम महाराष्ट्र देशा – पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 11 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यासंदर्भातला कार्यक्रम जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या मतदार संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेतील दुरुस्तीही त्यासाठी गृहीत धरली जाणार आहे.
या मतदार यादीसाठीच्या माहितीचं अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि मतदार यादीच्या छपाईसाठी 10 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल असं पुण्याच्या जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे काल सांगण्यात आलं.