सहा महिने तिहेरी तलाकवर बंदी

muslim-talaq

तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रिम कोर्टातने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. तिहेरी तलाक प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश जे.एस खेहेर यांच्यासह 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

तिहेरी तलाक प्रकरणात केंद्र सरकारने सर्वाच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. तिहेरी तलाक पद्धतीला आम्ही वैध मानत नाही.ही परंपरा सुरू रहावी, असे आम्हाला वाटत नाही, अशी भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. हे प्रकरण सुरू असताना ऑल इंडिया मुस्लिम पसर्नला लॉ बोर्डाने याबद्दल काझींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असे सुप्रिम कोर्टाने सांगितले होते. आता सुप्रिम कोर्टाने संसदेत नवा कायदा बनवण्यास सांगितले आहे.या सगळ्या प्रक्रियेदरम्यान सरकारची भूमिका अतिशय महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे . त्यामुळे आत संसदेच्या माध्यमातून होणाऱ्या नव्या कायद्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.