Abhishek Aishwarya – ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसणार

blank
मणिरत्नम हे सध्या हिंदी चित्रपट करण्याच्या तयारीत असून या चित्रपटाच्या कास्टिंगवर जोरात चर्चा सुरू आहे.  या चित्रपटात ऐश्वर्या रॉय व अभिषेक बच्चन ही जोडी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या रॉयने मणिरत्नम यांच्या चित्रपटातूनच आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली होती.
यापूर्वी मणिरत्नम यांनी ऐश्वर्या रॉय व अभिषेक यांना घेऊन ‘गुरू’ आणि ‘रावण’ यासारखे चित्रपट तयार केले आहेत. याशिवाय त्यांनी अभिषेकसोबत ‘युवा’ हा चित्रपटही तयार केलेला आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, दमदार स्क्रिप्ट असेल तरच मी ऐश्‍वर्यासोबत चित्रपटात काम करेल. केवळ ऐश्वर्या रॉय सोबत काम करण्यास मिळते म्हणून मी त्या चित्रपटात काम करणार नाही.

 

‘हाउसफुल-3 ‘ हा अभिषेक चा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता तर  ऐश्वर्या ने ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटात काम केलं होत.

‘रोजा’ , ‘बॉम्बे’ यासारखे चित्रपट मणिरत्नम यांनी यापूर्वी बनविले आहेत.  मणिरत्नम सद्या तेलुगु फिल्म ‘चेलिया’ मध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या पुढील हिंदी चित्रपटाची घोषणा करणार आहेत.

[jwplayer Gcqt5a1G]