औरंगाबाद : राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र, अजून याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. आता तरी महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करून राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या गुणवंत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. भाजप आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा केली होती. मात्र ३१ जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत, असेही भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि या जागा भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करत असून सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवावे असेही लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- ‘रात्रीच्या वेळचा बंद केलेला सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा’, आ.श्वेता महाले यांची मागणी
- ‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<