म्युकरमायकोसिस नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दंतरोग चिकित्सकांची रिक्त पदे भरा- खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोना रुग्ण संख्या सध्या कमी झालेली असली तरी धोका संपलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना प्रमाणेच त्यामुळे नंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजारामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यात दंतरोग चिकत्सकांची पदे रिक्त आहेत. ती तत्काळ भरावील अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी ही मागणी केली आहे. या आधी देखील घाटी आणि जिल्ह्यात रिक्त असलेल्या वैद्यकीय पदांसाठी खासदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर प्रशासनाला तत्काळ पदे भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

आता खासदार इम्तियाज जलील यांनी दंतरोग चिकित्सकांची पदे भरण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ते म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दंतरोग चिकित्सक यांची रिक्त पदे भरावीत, जेणे करुन या आजारावरील उपचार वेळेत उपलब्ध होऊन रुग्णांमध्ये घट होईल.’

महत्त्वाच्या बातम्या

IMP