कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यत आले होते

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणी गुजरामधील दलित समाजाचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आता एल्गार परिषद चांगलीच वादात अडकली आहे.

कोरेगाव-भीमाच्या लढ्याला २०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर महाराष्ट्र बंद देखील करण्यात आल होता. परंतु या सर्व प्रकरणी पोलिसांकडून फक्त गुन्हेच दाखल होत आहे मात्र, ठोस कारवाई अजून कोणावरही झालेली पाहायला मिळत नाही.

You might also like
Comments
Loading...