विरोधकांनी मांडला हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव

विरोधकांनी केला पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप

मुंबई: विरोधकांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव मांडला आहे. सभागृह चालवितांना हरिभाऊ बागडे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी आज विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली.

अजित पवार म्हणाले, सभागृहात गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. तसेच अध्यक्षांनी काही भूमिका न घेता दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आहे. अध्यक्षांना पदापासून दूर करण्यात यावे असे त्यात नमूद केले आहे.

‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’ असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

विरोधी पक्षाने आज हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे आता यापुढे विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

You might also like
Comments
Loading...