fbpx

निर्मात्यावर गुन्हा दाखल व्हावा; पद्मावत संदर्भात हिंदू जनजागृतीचे निवेदन

padmavat story

टीम महाराष्ट्र देशा :  हिंदू जनजागृती समितीतर्फे शासकीय महसूल बुडवणाऱ्या पद्मावतच्या निर्मात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, बुडवलेला महसूल वसूल करावा, अशी मागणी समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाड्ये यांनी केली आहे.

संजय लीला भन्साळी प्रॉडक्शन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे पद्मावत या वादग्रस्त चित्रपटाचे २० दिवस चित्रीकरण केले होते. चित्रीकरणासाठी नियमानुसार शासनाला १ लाख ९१ हजार ४५८ रुपये शुल्क आहे. मात्र १ लाख ६२ हजार ७४२ रुपयांचे शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. पोलिस, वन विभाग, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी अनुमती देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती अन संस्था यांच्याकडून चित्रीकरणासाठी अनुमती घेण्याची अट घातली होती. ती अट न पाळता चित्रीकरण करून शासनाची फसवणूक केली असून फौजदारी गुन्हा आहे.

बुडवलेला महसूल भरत नाहीत तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला शासनाने अनुमती देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून केली आहे. पत्रकार परिषदेस राजन बुणगे, राजश्री तिवारी, अनिता बोल्ली, वर्षा कुलकर्णी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment