धार्मिक फोटोला अश्लिल फोटो टॅग करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल; समाजाच्या भावना दुखावल्याची पोलिसात तक्रार

औरंंगाबाद : समाजाच्या व्हाटसअप ग्रुपवर धार्मिक प्रवचनाचा व्हिडीओ पाठविल्यावर त्याला अश्लिल फोटोने टॅग केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यावरुन नाशिक येथील संजय बैरागीविरुध्द याच्याविरुध्द सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास समजाच्या विविध कार्याची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हाटसअप ग्रुपवर एका महिलेने धार्मिक प्रवचनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याचवेळी बैरागी याने या धार्मिक व्हिडीओला अश्लिल फोटोने टॅग करीत तो व्हिडीओ दुसऱ्या ग्रुपमध्ये शेअर केला होता.

त्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याच्या घनश्याम रामदास वैष्णव (वय ७१) यांना सांगितले. याप्रकरणी घनश्याम वैष्णव यांच्या तक्रारीवरुन संजय बैरागीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :