हिंदू हा सर्वाधिक हिंसाचार करणारा धर्म असल्याचे सांगणाऱ्या उर्मिलाविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई : काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या नव्या वादात सापडल्या आहे. उर्मिलाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

उर्मिलाच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वा इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला उर्मिला मार्तोंडकर हिने एक मुलाखत दिली होती.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी केलेव्या वक्तव्यामुळे माझ्यासारख्या अनेक हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ही सर्व वक्तव्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केली आहेत. त्यामुळे उर्मिला मातोंडकर, राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, असे नाखवा यांनी म्हटले आहे.