सिंहगडावर नग्न अवस्थेत सन बाथ घेणाऱ्या लतीफ सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल

latif sayyd

पुणे : सिंहगडावर दूरदर्शन च्या आवारात असिस्टंट इंजिनियर लतीफ सय्यद नग्न अवस्थेत सन बाथ घेतांना सापडला आहे. दूरदर्शन केंद्राचा खाजगी प्रकारे वापर करून तिथे दारूच्या सर्रास पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे गडप्रेमींकडून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

सिंहगडावर नग्न अवस्थेत आदळलेल्या लतीफ सय्यद सय्यद विरुद्ध हवेली पोलीस स्टेशन मध्ये भांदवी २९५ (ए) आणि ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सिंहगड वर स्वच्छता मोहिमे दरम्यान राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे सदस्य दिलीप जांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लतीफ नग्न अवस्थेत सन बाथ घेतांना आढळला. लतीफ हा दूरदर्शनमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. लतीफ विरोधात दिलीप जांबळे यांनी फिर्याद दिली असून सदर गुन्ह्याचा  तपास हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. गोल्डे करीत आहेत.Loading…
Loading...