fbpx

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदारावर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : बेलापूरच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी चक्क मतदारांना लोकसभेत दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केले होते. या विषयी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आणि आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणे येथे युतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना म्हात्रे यांनी ‘अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा’ असा अजब सल्ला मतदारांना दिला होता. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून म्हात्रे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी केलेलं विधान त्यांचा अंगलट आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यापुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.