काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल 

पुणे : काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही वकील असून रोहित टिळक यानी 2015 ते 4 जुलै या दोन वर्षाच्या दरम्यान शारीरिक अत्याचार केल्याची सदर महिलेची तक्रार आहे.
आपली आर्थिक फसवणूक देखील करण्यात आल्याच तक्रारदार महिलेचं म्हणन आहे . टिळक याच्याकडून केल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळून तक्रारदार महिलेनं दोन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता.
भां.द.वि कलम 376, 377, 323, 504, 506, 507 नुसार टिळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित टिळक हे काँग्रेस पक्षाचे नेते असून 2014 मध्ये त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. टिळक हे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या पुतणे आहेत.