गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन अवैध दारू विक्रेत्याच्या विरेाधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक निर्माण करत, शहरामध्ये अवैध रित्या नारेगाव भागातील नगरगल्ली क्रमांक एक येथे दारू विक्री करणाऱ्या विजय एकनाथ पवार (४३, रा. नारेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळून १९ दारू बाटली जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी सिडको येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अन्य प्रकरणात नागसेन नगर उस्मानपुरा येथे कृष्णा लक्ष्मण भालेराव (४८) याच्या ताब्यातून विक्रीसाठी असलेली २१ देशी दारू बाटली जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गारखेडा परिसरात वेलकम समोरून सुतगिरणीकडे जाणाऱ्या रोडवर एका बँकेच्या समोर अवैध दारू विक्री करणाऱ्या अतुल दाभाडे (२४, रा. इंदिरानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून १४ दारू बाटली जप्त केली. या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या