सिल्लोड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

wadod bazar police station

औरंगाबाद : गावातीलच एक व्यक्ती ग्रामपंचायतीच्या जागेवर ताबा मिळवत अतिक्रमण करत होता. या व्यक्तीच्या विरोधात ग्रामसेवकानी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार सदर व्यक्तीविरोधात सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील वडोद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवीण्यात आला आहे.

१४ व्या वित्त आयोगातून सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायतीने स्वत: च्या मालकीच्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारले होते. या कामासाठी ग्रामपंचायतीच्या जागेवर किशोर इंडस्ट्रीजला ना नफा ना तोटा या तत्वावर शेड उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी या जलशुद्धीकरण केंद्रावर गावातील विष्णू सोपान जैवळ हा तरुण देखभाल व जलवितरणाचे काम पाहत होता. आता सदर केंद्राची दुरुस्ती करण्यासाठी मागील महिन्यातील १५ फेब्रुवारी पासुन हे जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.

मात्र विष्णू जैवळ यांनी बंद केलेल्या केंद्रावरील कुलुप तोडले व केंद्रावर ताबा मिळवला. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी हा प्रकार समजल्यानंतर विष्णूला समज दिली. यानंतर ग्रामपंचायतीने ४ मार्च रोजी पुन्हा आपले कुलूप लावले आणि केंद्र बंद केले. मात्र त्यानंतरही विष्णू जैवळ याने पुन्हा ६ मार्च रोजी सकाळी ग्रामपंचायतीने लावलेले कुलूप तोडले व परत ताबा मिळवला आणि अतिक्रमण करत वापर सुरू केला. यामुळे ग्रामसेवक प्रभाकर एकनाथ भादवे यांनी विष्णू जैवळविरुद्ध वडोद पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष डोंगरे पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP