fbpx

गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होतं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केलं होतं. या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती.

दरम्यान आता गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होतं असल्याचं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

अ‍ॅड. शशिकांत भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या १२४ कलम (राजद्रोहविषयक), ५०५(१) कलम (नौदल, हवाई दल, भूदलातील अधिकाऱ्यांविरोधात अफवा पसरविणे) व १२० ब कलम यांच्या अन्वये गुलाम नबी आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जवान काश्मीरमध्ये निरपराध्यांना ठार मारत आहेत, असा समज आझाद यांच्या उद्गारामुळे होऊ शकतो.