नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावणार : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. याविषयी नितेश राणे यांनी ज्या अभियंत्याचा अंगावर चिखलफेक केली त्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Loading...

या व्हिडिओमध्ये पाटील ‘अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केलाचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत,’ असं अभियंत्याच्या कुटुंबाला सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडिओमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी माझ्या मुलाला वाचवा असं म्हणत फोन केला होता. मात्र, आपण ठामपणे नाही म्हटल्याचं पाटील यांनी शेडेंकर कुटुंबीयाना सांगितलं.Loading…


Loading…

Loading...