प्रकाश आंबेडकरांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : श्री शिवप्रतिष्ठान

Prakash-Ambedkar

सांगली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले होते. तसेच या प्रकरणावरून सध्या गढूळ राजकारण पाहायला मिळत आहेत. करोगाव भीमा येथील हिंसाचारात एका मराठा युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच संभाजी भिडे यांचावर लावण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी सुद्धा केली.

काय म्हणाले चौगुले
संभाजी भिडे यांना जातीयवादी लोकांनी लक्ष्य केले आहे. त्यांचा कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराशी काहीही सबंध नाही. तसेच भिडेंवर दाखल करण्यात आलेला अट्रॉसिटीचा तसेच अन्य गुन्हे मागे घ्यावेत. गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील वातावरण दूषित झाले असून हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जातीयवादी शक्ती काम करत आहेत.
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या आंदोलनामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. संभाजी भिडे यांच नाव ज्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सांगितले त्यांची कसून चौकशी करण्यात यावी. भिडे यांना मानणारे सर्व समाजात लोक आहेत. त्यांनी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. शिवप्रतिष्ठानमध्ये सर्व जातींचे कार्यकर्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्माविषयी प्रबोधन करीत असतात. त्यांनी कधीही कोणत्याही जातीचा द्वेष केला नाही. काही परकीय शक्तीच्या मदतीतून काही लोक समाजात तेढ निर्माण करत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई