ब्राह्मण समाजाची बदनामी : शेट्टी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

पुणे : हातकणंगले मतदार संघात काल प्रचारा दरम्यान राजू शेट्टी यांनी ‘सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत’ असे जातीयवादी वक्तव्य केले आहे. त्या विरोधात ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने त्यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ब्राह्मण जागृती सेवा संघाचे अध्यक्ष अंकित काणे म्हणाले की, वास्तविक पाहता ब्राह्मण समाजाने स्वातंत्र्यपुर्व काळापासून देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. सैन्यातही सामान्य पदापासून अनेक महत्वाच्या पदांवर ब्राह्मण समाजातील देशभक्त आहेत. असे असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा जातीयवाद केला आहे. शेट्टी हे लोकप्रतिनीधी असून त्यांना सैनिक हा जातीचा नसतो तर देशाचा असतो हे समजू नये हे दुर्दैवी आहे. सैनिकांची जात काढून सैनिकांचा आणि ब्राह्मण समाजाचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे. तरी त्यांच्यावर आपण आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे आज करण्यात आली आहे.

Loading...

काणे पुढे म्हणाले की, शहिद जनरल अरूणकुमार वैद्य यांच्यापासून विंगकमांडर अभिनंदन पर्यंत समाजातील कित्येक जण सैन्यात आहेत. एअरमार्शल भुषण गोखले, कर्नल अरविंद जोगळेकर, ब्रिगेडिअर हेमंत महाजन, जनरल डी. बी. शेकटकर यांच्यासारखी शेकडो नावं सांगता येतील. पण आम्ही त्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून नाही तर देशाचे सुपुत्र म्हणून बघतो.

शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची आणि सैनिकांची बिनशर्थ माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात महाराष्ट्र भरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे देण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...तर भारतातील ४० कोटी लोकांना होऊ शकते कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
नांगरे पाटील 'अॅक्शन मोड'मध्ये, आता बाहेर पडूनच दाखवा
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारत कोरोनाच्या स्टेज-३मध्ये गेला असण्याची शक्यता: कोरोना टास्क फोर्स संयोजक डॉक्टरचा दावा
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
भारताचा मित्र असलेल्या ‘या’ राष्ट्रात चीनपेक्षा जास्त लोकांना झालाय संसर्ग
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
'नमस्कार! पुन्हा एकदा तुम्हाला घरी बसवणारा, तुम्हाला घरातून बाहेर पडू न देणारा व्यक्ती तुमच्या समोर'