‘रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ – आ. अतुल सावे

औरंगाबाद : कोरोणाचा वाढता संसर्ग शहरात आटोक्यात येत असला तरी, शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे समोर आले आहे. त्यामधील काही जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. अशा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. अतुल सावे यांनी प्रशासन-लोकप्रतिनिधीच्या आढावा बैठकीत केली आहे.

शहरातील परिस्थितीत सुधारणा होत आहे. तरी काही उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व लोकप्रतिनिधी व शासकिय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व व्हेंटिलेटर लवकर इन्स्टॉल करावेत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ऑक्सिजन प्लांट लवकर लवकर सुरू करण्यात याव्या, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन ८आठवड्यापासून बंद आहे ते लवकर सुरू करावे.

तसेच १८ ते ४५ वयातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे त्याचा टाइम बॉण्ड देण्यात यावा तसेच टेस्टिंग आणि ट्रेससिंगचे प्रमाण वाढवावे असे त्यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्या वर प्रशासन कितपत अंकुश ठेऊ शकणार असल्याची शहरात चर्चा होती.

महत्त्वाच्या बातम्या