राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या प्रांतीक सदस्या रश्मी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा : नारायण पाटील

करमाळा :  राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या प्रांतीक सदस्या रश्मी बागल व नवचैतन्य चे सागर कांबळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन  नवचैत्य सोशेल फाऊंडशेन व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची सीआयडी  चौकशी करावी अशी मागणी करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी  निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

यातील सविस्तर हकीकत अशी आहे की राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे याने नवचैतन्य सोशेल फाऊंडशेन स्थापन करुन सुरवातीला  पन्नास टक्के रक्कमे मध्ये सायकल, पिठाची चक्की, शिलाई व पिको फॉल ची मशिन अशा वस्तु चे वाटप करुन सर्वसामान्य लोकांना विश्वास संपादन केला  व त्यानंतर मोटार सायकल, ट्रॅक्टर ,जेसीबी साठी पैसे भरण्याचे आवाहन केले. या पन्नास टक्के रक्कमेत जेसीबी, ट्रैक्टर मिळतील ह्या अमिषाने तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी करडो रुपये गुंतवले आहेत व सागर कांबळे सर्वांना ठेंगा दाखवुन पसार झाला असून त्यामुळे लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक झाली आहे असा अरोप आ पाटील यांनी केला आहे.
letter

रश्मी बागल या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहुन लोकांना पैसे भरण्यास प्रवृत करत होत्या त्या मुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश सदस्या रश्मी बागल व नवचैतन्य चा सागर कांबळे यांच्या वर गुन्हा दाखल करावा  व सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आमदार नारायण पाटिल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे