फिल्मफेअर पुरस्कार ; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर विद्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

FilmfareAwards

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 63 व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स 2018 मध्ये ‘हिंदी मीडियम’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तर इरफान खान आणि विद्या बालन यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ पटकावली.तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Loading...

विशेष म्हणजे हरहुन्नरी अभिनेता राजकुमार रावनेही या सोहळ्यात तब्बल दोन फिल्मफेअर पटकावले. ट्रॅप्ड चित्रपटातील भूमिकेसाठी क्रिटीक्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि बरेली की बर्फी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार राजकुमारला मिळाला.

फिल्मफेअरच्या झगमगत्या सोहळ्याचं सूत्रसंचालन किंग खान शाहरुख आणि फिल्ममेकर करण जोहर यांनी केलं. मुंबईतील वरळीमध्ये शनिवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला.. यावेळी अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे –
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार
– सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)
– सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा – सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना – बद्रीनाथ की दुल्हनिया)
– सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा – सिनेमा जग्गा जासूस)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली