पुणे महापालिका सभागृहात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भिडले

पुणे : पुणे महापालिकेच्या सभागृहात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान जेष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने सर्वजण शांत झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सभागृहात बोलताना एका घटनेचा संदर्भ देत ‘भाजपचे गुंड’ असा उल्लेख केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजप नगरसेवकांनी पठारे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.  दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी पुढे येऊन परस्पर विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. शेवटी महापौर मुक्ता टिळक यांनी महेंद्र पठारे यांनी वापरलेले हे शब्द कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले.