fbpx

भाजपच्या मेळाव्यात तुंबळ हाणामारी; गिरीश महाजन होत आहेत ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यभरात भाजपसाठी संकटमोचक असणाऱ्या महाजन यांच्यावर आपल्या घरातील बंडखोरीचे संकट आले आहे.

अमळनेर येथे बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात येत आहे.