‘मैत्रिणीशी’ओळख करून न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

पुणे : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव दातार,अमोघ रानडे,गुरुबिरसिंग लांबा अशी अटक केलेल्याची नावे आहेत.पार्थ व्यास मित्र शंतनू राय त्याच्या दोन मैत्रिणींसोबत  बुधवारी रात्री मुंढवा परिसरातील लोकल गॅस्ट्रो बार या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते.त्या यावेळी आरोपीही जेवण्यासाठी आले होते. दातार पार्थ जवळ आला तुझ्या मैत्रिणींची ओळख करून दे त्यानंतर तुला दारू पाजतो असं सांगत हट्ट करू लागला .मात्र पार्थ ने या गोष्टी करायला नकार दिल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली .हॉटेलमधील बाऊन्सर्स ने मध्यस्थी केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे  असं वाटत असताना हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर पार्थला आणि त्याच्या सहकारी असलेल्या मैत्रिणींना आरोपींकडून मारहाण करण्यात आली.
या प्रकणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत असून आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी पार्थच्या पालकांकडून करण्यात आली आहे.
You might also like
Comments
Loading...